प्रतिनिधी
पनवेल आणि नवी मुंबईच्या हद्दीतील डान्स बार, हॉटेल, लॉजिंग याठिकाणी वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असून या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आल्याचे चित्र समोर दिसू लागले असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. येथील अनैतिक प्रकारांविरूद्ध कारवाई करायला नवी मुंबई पोलीस आयुक्त का घाबरतात? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
पनवेल येथील जगदंबा बार, चाणक्य बार, कपल बार, ग्रिट्स बार, कोनगाव येथील टायटन, नाईट रायडर, चांदणी, मूननाईट, स्वामी, माया बार, बिनधास्त, आयकॉन, बाँबे बार, कळंबोली येथील तानसा बार, कॅप्टन बार, तळोजा येथील चंद्रविलास बार, तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार, निसर्ग बार, कोन येथील नटराज बार (व्ही.आय.पी. रूम), साई दर्शन बार (पहिला मजला), वेल्वेट बार (रात्री २ नंतर) येथे वेश्या व्यवसाय सुरू, कोपरखैरणे येथील बेला, सावली, रबाळे एम.आय.डी.सी. येथील संगम, मूड, सेल्फी, मायरा, विटावा, सूरसंगीत डान्स बारमध्ये धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या बेकायदा प्रकारांना पायबंद कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. येथील सर्वच डान्सबारमध्ये धांगडधिंगा सुरू असल्यामुळे याठिकाणी आंबटशौकीनांची मोठी गर्दी होताना दिसत असते. या परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आलेले असून येथे डान्स बार च्या नावाखाली मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा सुरू असतो; तर काही बारमध्ये रात्रभर हुक्का सुरू असतो. इतकी भयानक परिस्थिती असताना पोलीस आयुक्त कारवाई का करीत नाहीत? कारवाई करायला पोलीस आयुक्त घाबरतात का? असा प्रश्न अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.पनवेल, नवी मुंबईतील हद्दीतील लेडीज डान्सबारमधील अनैतिक प्रकारांबाबत गृह विभागाला चौकशीचे आदेश.
पनवेल तालुका हद्दीत तसेच नवी मुंबईमध्ये चालू असलेल्या लेडीज डान्स बारमधील अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे हे कारवाई करीत नसल्याचे दिसून येत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी याप्रकरणी उच्चस्तरिय तक्रार दाखल केली असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गृह विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पनवेल, नवी मुंबई परिसरात अनैतिक प्रकारांना उधाण आलेले असून येथे ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली लेडीज डान्स बार मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा सुरू असतो; तर काही बारमध्ये रात्रभर हुक्का सुरू असतो. इतक्या भयानक परिस्थितीमुळे या परिसरात कायदा – सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवीन फॉर्मुला शोधून काढलेला आहे. तो असा की, प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे रात्री उशिरापर्यंत चालू नयेत म्हणून दुसऱ्या विभागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना क्रॉस चेकिंग करिता पाठवले जाते. परंतु या क्रॉस चेकिंगलाही शह देण्याच्या फॉर्मुला प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शोधून काढला असून त्यांच्या हद्दीतील रात्रगस्त करणारे अधिकारी यांची अगोदरच माहिती घेऊन त्यांना “मॅनेज” कसे करता येईल याची जुळवाजुळव करून पनवेल तालुका व नवी मुंबई हद्दीतील लेडीज डान्सबारवर कारवाई करण्यात येऊ नये याची काळजी ते घेत असतात. तसेच पनवेल तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रॉस चेकिंग करिता जातील तेव्हा त्यांनीही काही कारवाई करू नये असा हा ‘मॅनेज फॉर्म्युला’ आहे. परंतु या मॅनेज फॉर्म्युल्यामुळे या परिसरात अवैध धंद्यांना पाठबळ मिळू लागले असून यामुळे पनवेल तालुका आणि नवी मुंबई परिसरात पोलीसांची प्रतिमा मलीन होण्याच्या मार्गावर आलेली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून गृह विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.