Home Burglary मुंबई गुन्हे शाखेने बिहारमधील 3 रहिवाशांना अटक केली, अवैध शस्त्रास्त्रे जप्त…

मुंबई गुन्हे शाखेने बिहारमधील 3 रहिवाशांना अटक केली, अवैध शस्त्रास्त्रे जप्त…

0

मुंबई गुन्हे शाखेने बिहारमधील 3 रहिवाशांना अटक केली, अवैध शस्त्रास्त्रे जप्त*

मुंबई/-
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी रात्री बिहारमधील तीन रहिवाशांना भायखळ्यातील पायधोनी परिसरातून अटक करून शस्त्रांचा साठा जप्त केला.

आरोपी अभिषेक कुमार पटेल ,वय वर्षे २४,सिद्धार्थ सुमन उर्फ ​​गोलू,वय वर्षे २३ आणि रचित मंडल उर्फ ​​पुष्पक,वय वर्षे २७ यांनी त्यांच्या अटकेच्या दोन दिवस आधी मुंबईत शस्त्रे आणली होती.

भायखळा येथील पीडी मेलो रोडवरील प्रभू हॉटेलजवळ सापळा रचून तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, तीन सिंगल बोअर देशी बनावटीची बंदुक, दोन रिकामी मॅगझिन आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version