निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात तर पोलिस -पालिका प्रशासन कोमात!
मंडाळा स्क्रॅप मार्केट मध्ये ऑईल माफियांची दंडेलशाही आणि ऑईल चोरी जोमात;
निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात तर पोलिस -पालिका प्रशासन कोमात!
मानखुर्द/-
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अंतर्गत पालिका एम/पूर्व विभाग संबंधित अधिकारी आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ च्या अधिनिस्त मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे ऑईल माफिया यांच्या आर्थिक संगनमताने मंडाळा स्क्रॅप मार्केट मध्ये काळे ऑईल तत्सम प्रकारचे रासायनिक द्रव्यांची चोरी करण्यात येत आहे.अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने अवैध धंदे खुलेआम सुरु आहे. परिणामी मंडळा स्क्रेप मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक वेळा अग्नीने तांडव घालून निष्पाप नागरिकांचे जीव , वाढते धुरांचे प्रदूषण आणि वित्तहानी प्रचंड प्रमाणात होत. स्क्रेप मार्केट परिसरात ऑईल माफिया आणि इतर त्याचे साथीदार दररोज लाखोंच्या ऑईल चोरीचा अवैध धंदा करीत आहे.अशा अवैध धंद्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता.मानखुर्द सह अनेक पोलिस ठाण्यात ऑईल माफियावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात पोलिस प्रशासन धजावत नाही.
ऑईल माफियाच्या अवैध धंद्यात काम करणाऱ्या फिरोज नावाच्या तरुणाचा ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना या अगोदर घडलेली आहे. ती घटना तेल माफियांनी दडपल्याचे लोकांचे म्हणणे आहे.सदर प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यात कुचराई केली असल्याने प्रकरण उघडकीस आले नाही.
ऑईल माफिया गुंडप्रवृत्तीचा असलेला सोहेल, अली, राहत व रफिक हे मोठ्या ड्रममध्ये विषारी तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थ रोजच सेटिंग नुसार घेवून येतात.या ऑईल व केमिकल माफियांचा म्होरक्या सोहेल अणि अली नावाचे नामचीन गुंड राजकीय पक्षाच्या आश्रयात राहून अवैध धंदा मुंबई महानगर पालिका व बृहन्मुंबई पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून करीत आहेत.
ऑईल व केमिकल द्रव्य टँकर मधून काढतात चोरीचा माल जमा झाल्यावर रास्त दरात विकला जातो.असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मंडाळा स्क्रॅप मार्केट मध्ये ऑईल माफियांच्या ऑईल चोरीच्या धंद्यामुळे आगीचा अगडोंब कधीही उसळू शकतो.त्यामुळे आजूबाजूचे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.अशा नालायक लोकांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे,तर पोलिस -पालिका अधिकाऱ्यांच्या लाचखोरीने डोळेझाक होत आहे.सदर प्रकरणी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले यांनी आपण तत्काळ कारवाई करत आहोत असे सांगितले आहे