Saturday, October 12, 2024

जय श्री महाकाल,
जय श्रीकृष्ण.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ,अन्यायाविरुद्ध तडजोड न करणारे,हे ब्रिद वाक्य उराशी बाळगून “गुन्हेशोध “मराठी मासिकाचा शुभारंभ २००४ मध्ये परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाला.आजपर्यंत वीस वर्षातील या मराठी मासिकाची कामगिरी दैदिप्यमान आणि कौतुकास्पद राहिली आहे.वीस वर्षाचा प्रवासाचा लेखाजोखा, जनमानसात, पोलीस प्रशासन त उमठविलेला अलौकीक ठसा ही कामाची पावती आहे.सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारे मराठी मासिकाची ख्याती,आणि व्याप्ती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सर्व दुर पसरली आहे. हे गुन्हेशोध मासिकाच्या दृष्टीने अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे.मुळातच या मासिकाचा उद्देश,ध्येय, पारदर्शक राहिल्याने,जिथे अन्याय, अत्याचार असेल तिथे कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न ठेवता, गुन्हेशोध टीम ने अनेक गुन्हे प्रकाशात आणून, प्रशासनावर देखील लेखणीतून आसुड ओढुन,वेळोवेळी धारेवर धरले आहेत.कायद्याच्या राज्यात गुन्हेगारीचे साम्राज्याने, अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. हे भारताच्या लोकशाही समोरील मोठे आव्हान आहे.हे गुन्हेगारीचे आव्हान परतून लावण्यासाठी गुन्हेशोध या मराठी मासिकाने,सामाजिक आणि देशाशी बांधिलकीच्या भावनेने, पत्रकारितेच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलला आहे.२००४ साली लावलेले रोपटे आज या मासिकाचा वेल गगनाला पोहचला आहे.या नेत्रदीपक प्रगतीमध्ये अनेकांचे आशिर्वाद,योगदान आहेत. याबद्दल गुन्हेशोध परिवार कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्या कायम ऋणात राहील. हा जगन्नाथचा रथ पुढें नेण्यासाठी, खंबीर निर्भिड नेतृत्व, संपादक जयवंतराव दामगुडे साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.हे नाकारून चालणार नाही. अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडत आज गुन्हेशोध मासिक दोन तपानंतरही यशस्वी वाटचाल करीत आहे. संपादक,त्याचे कार्यक्षम असलेले कार्यकारी मंडळ याच्या सहकार्याने विस्तार, गुणवत्तापूर्ण होत आहे. याचा गुन्हेशोध परिवाराला मनस्वी आनंद होतो आहे. या गुन्हेशोध मासिकाची किर्ती सातत्याने वाढत राहो,यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना!

जय श्री महाकाल, जय श्रीकृष्ण.