Saturday, October 12, 2024
HomeCrime abroadकुंपनच शेत खायाला लागलं आता बोलावे काय?

कुंपनच शेत खायाला लागलं आता बोलावे काय?

पिंपरी- चिंचवड मधील फौजदारच निघाला ड्रग्ज तस्कर !

महाराष्ट्र पोलिसांची छबी दिवसेंदिवस खराब करण्याचे कुकर्म काही महिन्यांपासून सुरू आहे.सद्रक्षणाय खलनिग्रहणाय बिरुदावली मिरवणारी महाराष्ट्र पोलिस मधील काही ना लायक,भ्रष्टाचारात लिप्त महाभाग सचिन वाझे सारखे आज ही कोठे ना कोठे गुप्तपणे कार्यरत आहेत असेच काही नागरिकांना वाटू लागले आहे. जुना हिंदी चित्रपट मुजरीम मधील अभिनेता मिथुन चक्रवर्ती वर एक हिंदी गाणे चित्रित केलेले आहे असे की,मुजरीम ना कहो मुझे लोंगो मुजरीम तो सारा जमाना है।पकड गया वो चोर है। जो ना पकडा गया हो सयाना है। गाण्यातील शब्दांत मांडलेली रचना आज खरी ठरते आहे तेही काही पोलिसांच्या हलकट सवयीमुळे !

महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला ने पोलीस दलातील काही महाभाग, भ्रष्टाचार करणारे आणि सचिन वाझे सारखे असलेले नालायकांना शोधून त्यांच्यावर बडतर्फी कारवाई न करता त्यांच्यावरही न्यायोचित पणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी गुन्हेशोध मराठी मासिकाच्या वतीने राष्ट्र हितार्थ विनंती करीत आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ड्रग्स विक्री करणाऱ्या एकाला १ मार्च २०२४ रोजी अटक केल्यानंतर या प्रकरणात एका पोलीस फौजदाराला अटक करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात २ कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला १ मार्च २०२४ रोजी अटक केली होती. पोलिसांना या प्रकरणात आरोपीच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा थेट सहभाग असल्याचा संशय होता. अखेर निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या फौजदार विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, फौजदार शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

सदर प्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (१ मार्च) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. तेव्हा नमामी शंकर झा याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. आरोपीकडे जे ड्रग्स आढळून आले, त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलीस ठाण्याचा अधिकारी विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे.महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ माजली असून सर्वत्र पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे निर्देशनात येत आहे. संबंधित ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा थेट सहभाग असल्याचं उघड झाल्यानं एकच गोंधळ उडाला. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसून केलेल्या चौकशी नंतर फौजदार शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून ४४.५० किलो एमडी जप्त करण्यात आलं आहे. विकास शेळके याच्या मालकीचे पिंपरी चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. शेळके यानं यापूर्वी ड्रग्ज तस्करी केली आहे का? या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे.

पोलीस दलाची मान शरमेने खाली : या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान खाली गेली आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन कर्मचारी खंडणी उकळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. तर दोन अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लाच प्रकणात बदली करण्यात आली आहे.परंतु पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवड मधील आजही काही महाभागांनी डोळे उघडले नसून डोळ्यावर त्यांच्या बक्कळ पैसा कमविण्याचा पडदा पडलेला आहे.महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला ने पोलीस दलातील काही महाभाग, भ्रष्टाचार करणारे आणि सचिन वाझे सारखे असलेले नालायकांना शोधून त्यांच्यावर बडतर्फी कारवाई न करता त्यांच्यावरही न्यायोचित पणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी गुन्हेशोध मराठी मासिकाच्या वतीने राष्ट्र हितार्थ विनंती करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

relate blogs

Recent Comments