Saturday, October 12, 2024
HomeBurglaryपनवेल सुकापूर येथील राज क्लबमध्ये जुगार, अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून...

पनवेल सुकापूर येथील राज क्लबमध्ये जुगार, अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून गृह विभागाला चौकशीचे आदेश

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील राज क्लबमध्ये बेकायदा जुगार राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्याकडे पोलीसांनी हफ्ता घेऊन दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या बेकायदा जुगार क्लबच्या विरोधात वारंवार तक्रारी होत असताना देखील नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे हे गप्प का? अवैध धंद्याविरूद्ध कारवाई का करीत नाहीत? असा प्रश्न उपस्थित झालेला असून असून येथील अवैध धंद्यांना पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. येथून लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे सध्या पोलीसांची चांगलीच “चंगळ” होत असल्याचे दिसत आहे. येथे पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावर 3 पत्ती, 13 पत्ती पॉईंट रम्मी, 21 पत्ती पॉईंट रम्मी, 27 पत्ती पॉईंट रम्मी हे जुगाराचे गेम खेळले जात आहेत. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून गृह विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आता तर उच्चस्तरिय चौकशी होणार असल्याने येथील क्लब चालकाला आपला गाशा गुंडाळावा लागणार, हे निश्चित झालेले आहे.

या अवैध धंद्याकडून दर महिन्याला पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी येत असून या जुगाराच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा जुगार क्लबमुळे महिला वर्गातून देखील पोलीसांबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने हा जुगार क्लब तातडीने बंद करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केल्यानंतर याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी सुरू झालेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

relate blogs

Recent Comments

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील राज क्लबमध्ये बेकायदा जुगार राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्याकडे पोलीसांनी हफ्ता घेऊन दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या बेकायदा जुगार क्लबच्या विरोधात वारंवार तक्रारी होत असताना देखील नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे हे गप्प का? अवैध धंद्याविरूद्ध...पनवेल सुकापूर येथील राज क्लबमध्ये जुगार, अ‍ॅड. काशिनाथ ठाकूर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून गृह विभागाला चौकशीचे आदेश