Saturday, October 12, 2024
HomeBurglaryराजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा घातपात?

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा घातपात?

: राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा ६ फेब्रुवारी रोजी भीषण अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक असून त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र हा मत्यू घातपात आहे का अपघात, हे अजून कळले नाही.

त्यामुळे या वारीसे प्रकरण सोडवण्यासाठी खास एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का एसआयटी म्हणजे काय? आज आपण त्या संदर्भातच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Warise Murder Case : what is Special Investigation Team SIT and how does it work)

एसआयटी म्हणजे काय?

एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक (Special Investigation Team). वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हे घडल्यास त्यांचा सखोल तपास करणे, आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे, हे काम विशेष तपास पथक करत असते.

जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अनेक आरोप प्रत्यारोप होत असेल किंवा नवनवीन घटना उघडकीस येत असेल तेव्हा सहसा सुप्रीम कोर्ट या टीमला गठित करतात. यामध्ये काही न्यायाधीश आणि काही विशेषतज्ञ असतात. म्हणूनच याला विशेष पथक मानले जाते. मागील काही वर्षात सुप्रीम कोर्टाने अनेक प्रकरणात एसआयटीचं नेमली आहे.

एसआयटी कसं काम करते?

गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष तपास पथकांना नेमल्या जाते. सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार असतो अशा वेळी विशेष पथक नेमले जाते. चोरी, फसवणूक, खंडणी, हत्या, रहस्यमय मृत्यू यावेळी विशेष पथक नेमले जाते.

एसआईटी एका विशिष्ट वेळेत तपास करते. त्यानंतर त्यांची रिपोर्ट कोर्ट मध्ये सादर केली जाते. जर एसआईटीचं गठन राज्य सरकारने केले असेल तर रिपोर्ट सरकारला पाठवली जाते तर तेव्हा कोर्ट किंवा केंद्र सरकारला ही रिपोर्ट स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो.

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्यासोबत काय झालं होतं नेमकं?

सोमवारी ६ फेब्रुवारी दुपारच्या सुमारास राजापूर येथील पेट्रोल पंपासमोर एका थार गाडीने शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते गंभीरपणे जखमी झाले आणि त्यांना त्वरीत उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

relate blogs

Recent Comments