चाळीसगावात भरदिवसा पोलिसाचा खुन
५ जणांना अटक
जळगाव/-
महाराष्ट्रात पूर्वी पोलीस दादा वस्ती,गावात वाहनाने आलेला अबाल वृद्धाने पाहिला तरी लोकांच्या काळजात धस होई.पोलीस दादा ,मामांची खूप आदर्श दहशत असायची .तो काळ झपाट्याने बदलत गेला असून आज महाराष्ट्र पोलिसांची दहशत लोकांच्या मनात तिळमात्र उरली नाही. आज भरदिवसा पोलीस कर्मचाऱ्याची मर्डर होते किती भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये चक्क पोलिस कर्मचाऱ्याचा खून झाला आहे. शुभम अर्जुन आगोणे असं मयत पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शुभम हे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने चाळीसगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १४ जानेवारीच्या संध्याकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेदरम्यान मयत शुभम आगोणे यांचा एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. यानंतर सायंकाळी पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्गाजवळ सायंकाळी पाच वाजता ४ जणांनी शुभम आगोणे यांच्यावर तलवारीने सपासप वार केले.
या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाले, त्यावेळी त्यांना आसपासच्या नागरिकांनी खासगी वाहनातून नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. देवरे यांनी शुभम यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर तपासाची चक्रे फिरवली. काही वेळानंतर या घटनेतील ४ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. तसेच रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम आले होते.
या घटनेनंतर सामाजिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भरदिवसा पोलिस कर्मचाऱ्याचा खून होणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारचे गुन्हे थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजातील वाढती गुन्हेगारींचे मूळ ठेचून काढले पाहिजे! पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर पोलीस प्रतिबंधक कारवाई करीत नागरी,वस्ती मध्ये त्यांची धिंड काढली पाहिजे त्याचबरोबर पोलीस ठाणे हद्दीतील अनेक अवैध धंदे आणि त्यातील धंदेवाईक यांचा बिमोड केला पाहिजे.पोलिसांची वाढती गस्त व पोलीस बिट खुले ठेवून लोकांचे समस्यांचे निराकरण तत्काळ केले पाहिजे असे गुन्हेशोध मराठी मासिकाच्या वतीने जनहितार्थ मागणी केली आहे.